स्वालिया न. शिकलगार
साहित्य - रवा १ वाटी, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ: १/४ वाटी, दही : १/२ वाटी
पाणी १.५ ते २ वाट्या, इनो फ्रूट सॉल्ट १ चमचा, किसलेले आले
कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे: १/२ टीस्पून, मीठ, तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची
कृती- भांड्यात रवा, तांदूळ पीठ, दही, मीठ, जिरे, आले, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घ्या.
थोडे पाणी घालून गुठळ्या न होऊ देता नीट मिसळा.
मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा, रवा पाणी शोषून थोडा फुलेल.
गरज वाटल्यास आणखी थोडे पाणी घालून पीठ पातळ ताकासारखे करा
तवा गरम झाल्यावर, डोसे घालण्यापूर्वी पिठात इनो घाला.
त्यावर १ चमचा पाणी घालून हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवा
बुडबुडे दिसू लागल्यावर लगेच डोसा घालायला घ्या
टीप- तवा चांगला गरम करून थोडे तेल लावा.
पळीने किंवा वाटीने पीठ गोल फिरवा.