Chandipura Virus| बालकांच्या मृत्यूचे कारण ठरणारा चांदिपुरा विषाणू कुठून आला?

shreya kulkarni

चांदिपुरा विषाणूमुळे गुजरातमध्ये सहा बालकांचा मृत्यू झाला असून, मध्य प्रदेश आणि राजस्थानातही बालकांना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

अन्य राज्यांतही या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर या विषाणूविषयी थोडक्यात माहिती.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या ठिकाणी चांदिपुरा विषाणूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

या विषाणूची लागण गोचिड आणि डासांपासून होण्याचा संभव असतो. हा विषाणू रेबिजच्या फॅमिलीतील असल्याने जीवघेणा ठरू शकतो.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

लहान मुलांना याची लागण होण्याची दाट शक्यता असते. १९६५ साली महाराष्ट्रातील नागपुरातील चांदिपुरा या गावात हा विषाणू सर्वप्रथम आढळून आला होता.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

त्यावेळी या गावाचे अलगीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून या विषाणूस या गावाच्या नावावरून ओळखले जाते.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

Chandipura virusताप, खोकला, हागवण, उलट्या, गोवर आदी लक्षणे दिसून येतात. २४ ते ७२ तासांत उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याचा संभव असतो.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

या विषाणूचा संसर्ग झाल्यास प्रथम मेंदूला संसर्ग होतो. त्यामुळे रुग्ण तत्काळ कोमात जाण्याची भीती असते.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

हा विषाणू भारताशिवाय अन्य देशांत आढळत नाही. याच्यावर अद्याप प्रभावी लस नाही. त्यामुळे लक्षणे आढळताच तत्काळ उपचार हेच या विषाणूवरील रामबाण औषध समजले जाते.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo

कीटक प्रतिबंधक स्प्रे मारल्यास या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

चांदिपुरा विषाणू कुठून आला? | File Photo