Winter Tourism : हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी देशातील ६ सर्वोत्तम स्थळे!

पुढारी वृत्तसेवा

नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने भारतात पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत.

हिवाळ्यातील सुखद आणि सौम्य हवामान, सणांचे उत्साही वातावरण आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा तुमच्या सुट्ट्या अविस्मरणीय बनवतात.

जाणून घेवूया हिवाळी पर्यटनासाठीची भारतातील ६ सर्वोत्तम स्थळे

काश्मीर हिवाळ्यात जादूई भासते. बर्फावर स्कीइंग, शांतता आणि बर्फावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे सर्वात योग्य ठिकाण आहे.

हिमाचल प्रदेशातील मनालीमधील निसर्गरम्य दऱ्या आणि साहसी खेळांसाठी असलेला सुलभ प्रवेश पर्यटकांना ताजेतवाने करतात.

राजस्‍थानमधील उदयपूर डिसेंबरमधील आल्हाददायक हवामान आरामदायक पर्यटनस्थळ भेटीसाठी उत्तम आहे.

डिसेंबरमधील गोवा म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे उत्साही सेलिब्रेशन. इथे गजबजलेले किनारे, लाइव्ह संगीत, नाइटलाइफ आणि सीफूडचा आनंद लुटता येतो.

डिसेंबरमध्ये कर्नाटकातील कूर्ग हे ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि शांतता शोधणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी योग्य आहे.

केरळमधील कोचीतील समुद्र किनारा नेहमीच पर्यटकांना भूरळ घालताे.

डिसेंबरमध्ये कोहिमा येथे भव्य हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो. पर्यटक आदिवासी संस्कृती, संगीत, पारंपारिक कला प्रदर्शन आणि सुंदर डोंगराळ दृश्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

येथे क्‍लिक करा.