Rahul Shelke
नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांनंतर 200 आणि 500 रुपयांच्या भारतीय नोटांना परवानगी मिळाली आहे.
आता भारतातून नेपाळला जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पर्यटक, कामगार आणि व्यापाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे.
नव्या नियमांनुसार 200 व 500 चे नोटा ठेवता येतील. पण एकूण रक्कम 25,000 रुपयांपर्यंतच असावी लागेल.
हा नियम भारतीय आणि नेपाळी नागरिकांना लागू आहे. सीमा ओलांडताना मोठ्या नोटा बाळगणे आता बेकायदेशीर नाही.
आधी नोटबंदी नंतर 100 रुपयांवरील नोटांवर बंदी होती. यामुळे कामगार आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
लोकांना लहान नोटांमध्ये पैसे न्यावे लागत होते. चोरी, पाकीटमारी आणि दंडाची भीती कायम असायची.
आता या निर्णयामुळे नेपाळमधील हॉटेल्स व बाजारांना फायदा होईल. भारतीय पर्यटक सहज खर्च करू शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेपाळमध्ये भारतीय रुपयाची किंमत वेगळी असते. 1 भारतीय रुपया = सुमारे 1.60 नेपाळी रुपये.
200 भारतीय रुपयाची किंमत नेपाळमध्ये सुमारे 320 रुपये होते. एक्सचेंज चार्जनंतर साधारण 312 ते 318 रुपये मिळतात.