Sourav Ganguly : भारतीय संघाचा दादा! सौरव गांगुलीचे ८ रेकॉर्ड्स, जे मोडणे कठीणच!

मोहन कारंडे

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळाडू घडले, ज्यांनी भारताला 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिला.

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, हरभजन सिंह, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या खेळाडूंनी आपली चमक दाखवली.

सौरव गांगुलीने 1999 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टॉन्टन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या होत्या. आजही वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूच्या सर्वाधिक धावा आहेत.

1997 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टोरांटो येथे झालेल्या वनडे मालिकेत सौरव गांगुलीने सलग चार वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला होता.

2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध बेंगळुरूमध्ये झालेल्या टेस्ट सामन्यात गांगुलीने 239 धावांची खेळी केली. ही टेस्ट क्रिकेटमध्ये डावखुऱ्या भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी आहे.

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये गांगुली आणि द्रविडने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 318 धावांची भागीदारी केली होती. वर्ल्ड कपमध्ये भारताची सर्वात मोठी भागीदारी आहे.

2000 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने 117 धावा केल्या होत्या. आजही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील ही सर्वोच्च खेळी आहे.

सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही वनडे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी ओपनिंग जोडी आहे. त्यांनी 136 वनडे डावांमध्ये 6609 धावा केल्या आहेत.

गांगुली आणि तेंडुलकर या जोडीचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ही आहे. त्यांनी 176 डावांमध्ये 47.55 च्या सरासरीने 8227 धावा केल्या आहेत.

गांगुलीने ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये गांगुली, ख्रिस गेल, शिखर धवन आणि हर्शल गिब्स हे संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.

जोकोव्‍हिच @100, जाणून घ्‍या 'विम्बल्डन'मधील ऐतिहासिक कामगिरी