Namdev Gharal
जबलपूर - भोपाल या नॅशनल हायवे वर एकाठिकाणी भारतातील पहिली ‘रेड रोड’ बनवला आहे. यासाठी जवळपास 122 कोटी रुपये खर्च आला आहे.
टेबल-टॉप रेड मार्किंग या रस्तयावर जबलपूर ते भोपाळ दरम्यानच्या महामार्गावर ५ मिमी जाडीचा लाल रंगाचा विशेष थर (Table-top Red Marking) चढवला आहे.
राणी दुर्गावती टायगर रिझर्वमध्ये हा 2 किलोमिटरचा रस्ता तयार केला आहे. वन्यजिव सुरक्षा कारणासाठी पूर्ण जंगलातील पट्टा आहे याठिकाणहून इकडून तिकडे वन्यजीव रस्ता पार करतात.
या टेबल टॉप मार्कींग मुळे या रस्त्यावर जाताना वाहनचालकांना हलके झटके बसतात त्यामुळे आपोआप वाहनाचा वेग कमी होतो. परिणामी धडक बसून वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतत नाही.
या ठिकाणाहून रस्ता पार करताना आफ्रिकेहून भारतात आणलेल्या एका चित्त्याचा एका वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता त्यानंतर हे पाऊल उचण्यात आले.
लाल रंग हा धोक्याचे प्रतीक मानला जातो. चालकाला दुरूनच हा 'रेड कार्पेट' सारखा रस्ता दिसल्यामुळे तो सावध होतो की आपण वन्यजीव क्षेत्रात (Danger Zone) प्रवेश करत आहोत
अभयारण्यात या हायवेचा सुमारे १२ किमीचा पट्टा (Hiran-Sindoor section) या प्रकल्पांतर्गत येतो, ज्यापैकी २ किमीवर हे विशेष रेड मार्किंग करण्यात आले आहे
तसेच वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना अडथळा येऊ नये म्हणून या पट्ट्यात सुमारे २५ अंडरपास बांधण्यात आले आहेत
याचबरोबर प्राण्यांनी मुख्य रस्त्यावर येऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ८ फूट उंच लोखंडी जाळ्यांचे कुंपण लावण्यात आले आहे