पुढारी वृत्तसेवा
वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी व बनवण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जाणारे भारतातील प्रमुख राज्यातील हे प्रसिद्ध चहाचे प्रकार -
आसाम टी : प्रत्येक घरांमध्ये पिला जाणारा हा कडक, गडद रंगाचा, स्ट्रॉंग चहा मानला जातो.
दार्जिलिंग टी : याला चहाचे 'शॅम्पेन' म्हटले जाते. सुगंध, चव सौम्य व वेगळी असते. हा बहुदा दूध-साखरेविना पिला जातो.
निलगिरी टी : केरळ-तामिळनाडूत निलगिरीच्या पर्वतरांगांमधील ही पाने फळांसारखी सुगंधित, सौम्य चवीला असतात
याचा वापर 'आईस्ड टी' (Ice Tea) बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.
काहवा: हा हिरवा चहा केशर, दालचिनी, वेलची, बदाम घालून बनवला जाणारा पारंपारिक काश्मिरी चहा आहे.
नून चहा/शीर चाय: हा चहा गुलाबी रंगाचा असतो. यात दूध, पिस्ता, बदाम आणि चिमूटभर मीठ टाकून बनवला जातो
कांगडा टी: हिमाचलच्या कांगडा व्हॅलीत तयार होणारा चहा औषधी गुणधर्मांसाठी, खास सुगंधासाठी प्रसिद्ध आहे.
कटिंग चाय/मसालेदार चहा: महाराष्ट्रात दुधाचा कडक चहा, ज्यामध्ये आले, वेलची आणि खास चहाचा मसाला वापरला जातो.