पुढारी वृत्तसेवा
दाढी-मिशा असलेले हनुमान! राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील हे मंदिर 'सालासर बालाजी' म्हणून प्रसिद्ध आहे.
चित्रकूटमधील एका पहाडावर वसलेले हनुमान मंदिर.
दुःख दूर करणारा मारुती! वाराणसीतील हे मंदिर गोस्वामी तुलसीदास यांनी स्थापन केल्याचे मानले जाते.
अयोध्येचा रक्षक! मान्यतेनुसार, अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनापूर्वी भाविक येथे नतमस्तक होतात.
गुजरातच्या सारंगपूरमधील कष्टभंजन हनुमान मंदिराबाहेरील भव्य मूर्तीसमोर भाविक नतमस्तक होतात.
निद्रिस्त हनुमान! प्रयागराजमध्ये हनुमानाची दुर्मिळ आणि भव्य अशी झोपलेली मूर्ती पाहायला मिळते.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजी मंदिरात संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक येतात.
तुंगभद्रा नदीच्या काठावर, हंपीजवळील या टेकडीवर मारुतीचा जन्म झाल्याचे मानले जाते.
तमिळनाडूतील नमाक्कल येथील १८ फूट उंच, उघड्या आकाशाखाली असलेली एकाच पाषाणातील हनुमान मूर्ती.