Namdev Gharal
अमेझॉनच्या जंगलात अनेक रहस्य लपलेली आहेत. यामध्ये एक वैशिष्ठ्यपूर्ण साप आढळतो. जो आपत्या इंद्रधनुष्यातील सात रंगामध्ये दिसू शकतो.
Brazilian Rainbow Boa (ब्राझिलियन रेनबो बोआ) याचे नाव असून हा जगातील सर्वात सुंदर सापांपैकी एक मानला जातो. हा बिनविषारी असतो.
त्याच्या शरीरावर दिसणारी इंद्रधन्यूसारखी चमक ही त्याची सर्वात खास ओळख आहे. त्यांचा मूळ रंग सामान्यतः लाल, नारंगी ते महोगनी ब्राउन असतो.
हा रंग बदलतो म्हणजे. खरोखर रंग बदलत नाही पण त्यांच्या पाठीवर असलेली स्केल्स सूर्यप्रकाशात अशी रचना करतात की ती इंद्रधन्यूषासारखी दिसतात
त्यांच्या स्केल्सचा वरचा थर पारदर्शक असतो आणि आतले सूक्ष्म रिड्जेस प्रकाशाला विभाजित करतात, ज्यामुळे हा रंगीबेरंगी (rainbow) प्रभाव तयार होतो.
Brazilian Rainbow Boa प्रामुख्याने ॲमेझाॅन रेनफॉरेस्ट, ब्राझील, गयाना, सुरिनाम, पेरू, व्हेनेझुएला या प्रदेशात आढळतो.
हा Brazilian Rainbow Boa बिनविषारी, सुंदर, अजगरासारखा दम घोटून शिकार करणारा साप आहे.
याच्या सुंदरपणा मुळे व इंद्रधनुष्यी रंगासारख्या भासमान रुपामुळे अमेरिका खंडात अनेकजण याला पाळीव म्हणून घरात ठेवतात
याची लांबी 5 ते 7 फूटापर्यंत असते, तर वजन 2 ते 3 किलोपर्यंत जाते. याची अंडी शरीरातच विकसित होताम व मादी थेट जिवंत पिल्लांना जन्म देते.
एकावेळी 12 ते 30 पिल्ले जन्माला येतात. पिल्ले जन्मल्या क्षणीही चमकदार आणि सुंदर असतात.
याच्या सुंदरपणामुळे त्यांना “Rainforest Jewels” किंवा “जिवंत रत्न” (living jewel) देखील म्हटले जाते.