स्वालिया न. शिकलगार
अनुलोम-विलोम : फुफ्फुसांच्या शुद्धीसाठी, ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे
दोन्ही नाकपुड्यांमधील संतुलन राखले जाते आणि श्वसनमार्ग मोकळा होतो.
भस्त्रिका प्राणायाम : यात वेगाने श्वास आत घेणे आणि सोडणे केले जाते
यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढते, श्वसनसंस्थेतील अशुद्धी दूर करते
भ्रामरी प्राणायाम : डोळे बंद करून श्वास घेताना भुंग्यासारखा आवाज काढला जातो
यामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे श्वसनमार्गाला, मेंदूला आराम मिळतो.
उद्गीत प्राणायाम : दीर्घ श्वास घेऊन 'ॐ' चा उच्चार केला जातो
यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि मन पूर्णपणे शांत होते.
भुजंगासन, मत्स्यासन : यामुळे फुफ्फुसांना जास्तीत जास्त हवा साठवण्यासाठी जागा मिळते.