पुढारी वृत्तसेवा
इम्तियाज अलींची एकूण संपत्ती किती?
'रॉकस्टार' ते 'तमाशा'सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आज किती कोटींचे मालक आहेत? जाणून घ्या.
बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक
इम्तियाज अली हे बॉलिवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांच्या वेगळ्या कथाकथन शैलीने त्यांना खास ओळख मिळवून दिली.
एकूण संपत्ती किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्तियाज अली यांची एकूण संपत्ती सुमारे १५० ते २०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
एका चित्रपटासाठी किती मानधन?
इम्तियाज अली एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपये मानधन घेतात, असे सांगितले जाते.
ब्लॉकबस्टर चित्रपटांची मालिका
'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'हायवे', 'तमाशा', 'लव्ह आज कल' आणि 'चमकीला' यांसारख्या चित्रपटांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली.
स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस
२०१३ मध्ये त्यांनी Window Seat Films या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या बॅनरअंतर्गत ते चित्रपट आणि वेब प्रोजेक्ट्सची निर्मिती करतात.
कमाईचे इतर स्रोत
चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड जाहिराती, इव्हेंट्स, निर्मिती हक्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्ट्समधूनही त्यांची मोठी कमाई होते.
यशाचं गमक काय?
इम्तियाज अली यांच्या चित्रपटांमध्ये प्रेम, नातेसंबंध, जीवन आणि आत्मशोध यांसारखे विषय वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.
प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात
थिएटर असो किंवा OTT, इम्तियाज अली यांच्या प्रोजेक्ट्सची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे त्यांची बाजारातील मागणी कायम आहे.