Home Loan घेताय...? व्याजापेक्षाही 'या' तांत्रिक गोष्टी आहेत महत्त्वाच्या; अन्यथा होईल नुकसान

पुढारी वृत्तसेवा

होम लोन घेताना फक्त 'व्याजदर' पाहू नका

बहुतेक लोक फक्त कमी व्याजाचा विचार करतात, पण त्याशिवाय अनेक तांत्रिक बाबी महत्त्वाच्या असतात.

प्रोसेसिंग फीची पडताळणी करा

कर्ज मंजूर करताना बँका १% ते २% पर्यंत प्रोसेसिंग फी आकारतात, जी तुमच्या खिशावर भार टाकू शकते.

फोरक्लोजर चार्जेस तपासा

जर तुम्ही मुदतीआधी कर्ज फेडणार असाल, तर बँक किती 'पेनल्टी' किंवा शुल्क आकारते हे जाणून घेणे आवश्यक आहे.

हिडन चार्जेस (Hidden Charges)

लीगल फी, व्हॅल्युएशन चार्जेस आणि डॉक्युमेंटेशन फी यांसारख्या लपलेल्या खर्चांची आधीच माहिती घ्या.

रीसेट क्लॉज (Reset Clause)

फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमध्ये 'रीसेट क्लॉज' कसा काम करतो, हे समजून घेतल्यास भविष्यातील हप्त्यांचा अंदाज येईल.

इन्शुरन्स पॉलिसीची अट

अनेक बँका कर्जासोबत 'होम लोन प्रोटेक्शन प्लॅन' घेण्याची सक्ती करतात; त्याचा प्रीमियम आणि गरज तपासा.

क्रेडिट स्कोअरचा प्रभाव

तुमचा सिबिल (CIBIL) स्कोअर फक्त व्याजदरच नाही, तर कर्जाची मर्यादा आणि अटी देखील ठरवतो.

डॉक्युमेंटेशनमधील स्पष्टता

 टायटल क्लिअरन्स रिपोर्ट आणि पझेशनची तारीख या तांत्रिक गोष्टी कागदपत्रांमध्ये नीट तपासूनच स्वाक्षरी करा.

येथे क्लिक करा...