पुढारी वृत्तसेवा
वारकरी संप्रदायात तुळशीची माळ ही भक्तांची ओळखही मानली जाते
वारीमध्ये वारकरी गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध, हातात टाळ घेऊन विठ्ठलाचा नामगजर करतात
त्यामुळे ही माळ भक्ती, समर्पण आणि समानतेचेही प्रतीक ठरते
वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेचे महत्त्व पुढीप्रमाणे आहे
असे मानले जाते की, गळ्यात माळ घातल्यानंतर व्यक्तीमधील 'मी'पणा किंवा अहंकार गळून पडतो
संतांच्या मते, तुळशीच्या माळेमुळे शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते
मनातील वाईट विचार दूर ठेवण्यास ही मदत करते
वारीमध्ये श्रीमंत-गरीब, उच्च-नीच असा कोणताही भेद नसतो
प्रत्येकाच्या गळ्यात असलेली तुळशीची माळ सर्वांना एकाच धाग्यात बांधते.