study break benefits : अभ्‍यास करताना ब्रेक महत्त्‍वाचाच! जाणून घ्‍या फायदे

पुढारी वृत्तसेवा

अभ्‍यासा दरम्‍यान घेतलेल्‍या लहान विश्रांतीमुळे मन ताजेतवाने होते. अभ्यासावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

लहान विश्रांतीमुळे दीर्घकाळ अभ्यासामुळे येणारा मानसिक थकवा टाळता येतो.

विश्रांती घेतल्याने मेंदू माहिती अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करतो आणि लक्षात ठेवतो.

अल्‍प विश्रांतीमुळे अभ्यास दीर्घकाळ करण्‍यास मदत होते.

सतत अभ्यास करण्यापेक्षा विश्रांती घेऊन अभ्यास केल्याने स्‍मरणशक्‍ती वाढते.

अल्‍पकाळ विश्रांती घेतलेले मन शिकताना किंवा उजळणी करताना निष्काळजीपणामुळे होणाऱ्या चुका कमी करते.

नियोजित विश्रांतीमुळे परीक्षेच्या तयारीदरम्यान वेळेचे उत्तम व्यवस्थापन करण्यास मदत होते.

अभ्‍यास करताना घेतलेला लहान ब्रेक तणाव कमी करण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांना शांत ठेवतात.

येथे क्‍लिक करा.