पुढारी वृत्तसेवा
१८६० च्या दशकात जर्मन डॉक्टर 'कार्ल वुंडरलिक' यांनी २५,००० रुग्णांच्या १० लाखांहून अधिक तापमानाची नोंद घेऊन ३७°C (९८.६°F) हा जागतिक निकष ठरवला होता.
अलीकडील संशोधनानुसार गेल्या दीड शतकात मानवी शरीराचे सामान्य तापमान बदलले आहे. मूळ निकष चुकीचा होता की आपले शरीर बदलत आहे?
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या तुलनेत आजच्या अमेरिकन पुरुषांच्या शरीराचे तापमान सुमारे ०.५९°C ने कमी नोंदवले गेले आहे.
केवळ विकसित देशांतच नव्हे, तर ॲमेझॉनच्या पर्जन्यवनात राहणाऱ्या 'त्सिमाने' आदिवासी समुदायाचे तापमानही २०१८ मध्ये घसरून ३६.५°C वर आले आहे.
संशोधनासनुसार, पूर्वीच्या तुलनेत आज मानवाचे आरोग्य सुधारले आहे. पूर्वी शरीर सतत आजारांशी लढत असल्यामुळे जास्त ऊर्जा (उष्णता) खर्च होत असे.
एसी आणि हीटरमुळे आज आपण अशा वातावरणात राहतो जिथे शरीराला तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फारशी मेहनत करावी लागत नाही.
वय, लिंग, दिवसाची वेळ आणि उंची-वजन या घटकांवर मानवी शरीराचे मूळ तापमान अवलंबून असते. महिलांचे तापमान पुरुषांपेक्षा थोडे जास्त असते.
जुने थर्मोमीटर जास्त तापमान दाखवत असावेत अशी शक्यता वर्तवली जात असली, तरी नवीन पिढ्यांचे शारीरिक तापमान खरोखरच कमी झाल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात आता या बदलाची दखल घेतली जात आहे. तापमान ३५°C पेक्षा खाली किंवा ४०°C च्या वर गेल्यास मात्र ते गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते.