Woodpecker Facts|दिवसभर 10,000 वेळा झाडावर चोच मारुनही सुतारपक्ष्याचा मेंदू सुरक्षित कसा राहतो ?

Namdev Gharal

सुतारपक्षी हा आपण सर्वच जाणतो. झाडाच्या मोठ्या बुंद्यावर मोठमोठ्याने चोच मारुन तो घरटे तयार करतो किंवा अन्न शोधतो किंवा अन्न साठवून ठेवण्यासाठी छिद्र पाडत असतो.

हा पक्षी ज्यावेळी झाडावर चोच मारतो त्‍यावेळी तेव्हा त्याचा वेग थक्क करणारा असतो. सेकंदाला साधारणपणे २० ते २५ वेळा झाडावर ठोके मारू शकतो. दिवसभरात हा पक्षी सुमारे ८,००० ते १२,००० वेळा झाडावर चोच मारतो.

इतक्यावेळी चोच आपटूनही त्‍याच्या मेंदूला का धक्का बसत नाही. कारण इतक्या वेगाने व इतक्यावेळी कोणत्‍याही पक्ष्याने चोच मारली किंवा डोके आपटले तर मेंदूचा भुगा होऊन जाईल

सुतारपक्ष्याला निसर्गाने एक खास देणगी दिली आहे. ती म्हणजे त्‍याच्या मेंदूभोवती असलेले आवरण हे आवरण त्‍याच्या जीभेला सपोर्ट करणारे हाड असते. हायॉइड हाड (Hyoid Bone) असे म्हटले जाते

सुतार पक्ष्याच्या जिभेचे हाड (Hyoid bone) खूप लांब असते. हे हाड त्याच्या चोचीपासून निघून पूर्ण कवटीला (Skull) वेढून परत चोचीकडे येते.

हे हाड किंवा पर्यायाने जीभ त्‍यांच्या मेंदूला पूर्ण वेढा घालते ते हेल्मेटसारखे काम करते, जे झाडावर चोच मारुन तयार होणाऱ्या धक्क्यांपासून मेंदूचे रक्षण करते.

दुसरी गोष्ट म्हणजे सुतारपक्ष्याची कवटी समोरच्या बाजूला अतिशय लवचिक आणि स्पंजसारख्या सच्छिद्र हाडांनी बनलेली असते. हे हाड चोचीतून येणारा धक्का शॉक अब्जॉबर सारखा शोषून घेते .

सुतार पक्ष्याचा मेंदू त्याच्या कवटीमध्ये अतिशय घट्ट बसलेला असतो. माणसाच्या मेंदूभोवती असते, ज्यामुळे जोराचा धक्का लागल्यावर मेंदू कवटीला आदळतो. पण सुतार पक्ष्याच्या बाबतीत असे होत नाही, त्यांचा मेंदू हलत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची वरची चोच खालच्या चोचीपेक्षा किंचित लहान असते. यामुळे तो चोच ज्यावेळी झाडावर आदळतो, तेव्हा निर्माण होणारी ऊर्जा थेट मेंदूकडे न जाता शरीराच्या खालच्या भागाकडे वळवली जाते.

तसेच तो झाडावर ठोका मारण्यापूर्वी काही मिलिसेकंद आधी त्यांची तिसरी पापणी मिटते. यामुळे डोळे सुरक्षित राहतात आणि लाकडाचा भुसा डोळ्यांत जात नाही.

See Otter | उदमांजर एक ‘दगड‘ आयुष्यभर का जपून ठेवते?