See Otter | उदमांजर एक ‘दगड‘ आयुष्यभर का जपून ठेवते?

Namdev Gharal

तुम्हाला माहिती आहे का उदमांजर एक पाण्यावर उपजिवीका करणार यशस्वी शिकारी आहे. मासे खेकडे शंख हे त्‍याचे प्रमुख खाद्य आहे.

पण याची एक मुख्य सवय असते ती म्हणजे हत्‍याराचा वापर करणे. हे हत्‍यार म्हणजे एक साधा दगड

पण एखाद्या उदमाजंराने एखादा दगड घेतला की तो ते वर्षानुवर्षे सोबत ठेवते. काही वेळा तो हा दगड आपल्या पिल्लांना वारशानेही देते

हा दगड म्हणजे त्‍यांच्यासाठी एक मौल्यवान खजिना असतो. कारण या दगडाने ते कठीण कवचाचे खेकडे किंवा शंख तोडून खातात.

समुद्राच्या तळाशी जाऊन कडक कवच असलेले खेकडे, शिंपले (Clams) आणि गोगलगायी पकडतात. हे कडक कवच फोडण्यासाठी ते दगडाचा वापर 'पाटा-वरवंटा' किंवा 'हातोडी' सारखा करतात.

ऊदमांजर जेव्हा शिकार करतात, तेव्हा ते पाठीवर (उताणे) तरंगतात. ते आपल्या पोटावर एक मोठा सपाट दगड ठेवतात आणि त्यावर पकडलेले शिंपले जोरात आपटतात.

निसर्गाने ऊदमांजरांना त्यांच्या पुढच्या पायांच्या खाली (काखेजवळ) सैल त्वचेची एक नैसर्गिक पिशवी दिली आहे. ते आपला आवडता दगड आणि पकडलेली शिकार या पिशवीत सुरक्षित ठेवतात.

अनेक ऊदमांजरांकडे त्यांचा हा 'फेव्हरेट दगड' असतो. तो दगड त्यांना शिकारीसाठी योग्य वाटतो, म्हणून ते तो दगड आयुष्यभर किंवा बराच काळ स्वतःजवळ बाळगतात.

शिकार करून झाल्यानंतर ते आपला आवडता दगड पुन्हा त्या त्वचेच्या पिशवीत नीट ठेवून देतात.

शास्त्रज्ञांच्या मते, ऊदमांजर ही पद्धत त्यांच्या आईकडून शिकतात. विशेष म्हणजे, मादी ऊदमांजर नरांपेक्षा दगडांचा वापर अधिक कौशल्याने करतात.