पुढारी डिजिटल टीम
स्टेन्सिल लावण्यापूर्वी हातावर कोणताही लोशन किंवा ऑइल नसावे, नाहीतर स्टेन्सिल नीट चिकटत नाही.
स्टेन्सिलमध्ये हवा राहणार नाही याची खात्री करा. त्यामुळे मेहेंदी पसरत नाही.
जाड नोजलने मेहेंदी उतरेल किंवा ब्लीड होईल. बारीक नोजल सर्वोत्तम.
जोरात दाब दिल्यास पेस्ट बाहेर येऊन डिझाइन खराब होऊ शकते.
सीमेबाहेर पेस्ट जाऊ नये म्हणून पेस्ट गाइडलाइनमध्येच ठेवा.
पूर्ण कोरडे झाल्यावर स्टेन्सिल काढणे कठीण होते, त्यामुळे अर्धवट वाळल्यानंतरच काढा.
स्टेन्सिल सरकल्यास डिझाइन स्मजिंग होऊ शकते.
डॉट्स, पानं, छोट्या भरतकामासारखे भरल्यास डिझाइन आकर्षक दिसते.
नींबू-साखरेचे पाणी लावल्याने रंग गडद येतो. स्टेन्सिल मेहेंदीचा रंगही टिकाऊ होतो.