स्वालिया न. शिकलगार
साडीच्या काठावर मंदिरासारखी हातानं डिझाईन काढली. त्यामुळे तिला करवती सिल्क टसर साडी म्हणतात
ही साडी विदर्भाची शान आहे
या साडीच्या रेशीम धाग्यासाठी अंडी मिळवली जातात
ते फुटल्यानंतर त्यातून रेशीमच्या अळ्या बाहेर पडतात. त्यानंतर अळ्यांची जंगलात येनाच्या झाडावर लागवड केली जाते.
ही अळी मोठी व्हायला एक ते दीड महिना लागतो. त्यानंतर अळी कोसा बांधायला सुरुवात करते.
एका दिवसात देठ तयार होते. त्यानंतर आठ दिवसात स्वतःभोवती पूर्ण कोसा तयार होतो
फुटलेल्या कोशापासून निघणाऱ्या धाग्याला घिचा रेशीम म्हणतात. अळीचं फुलपाखरू तयार होतं.
पुढे याच फुलपाखारापासून आणखी अंडी तयार होतात. करवत काठी साडी विणायला हाच कोसा लागतो