मोनिका क्षीरसागर
हेअर सीरम लावताना केसांची लांबी आणि घनता लक्षात घेऊनच त्याचे थेंब हातावर घ्यावेत.
साधारणपणे मध्यम लांबीच्या केसांसाठी सीरमचे २ ते ३ थेंब पुरेसे असतात; अतिवापरामुळे केस तेलकट दिसू शकतात.
सीरम थेट केसांवर न लावता, आधी तळहातावर घेऊन दोन्ही हात एकमेकांवर घासून ते थोडे कोमट करावे.
सीरम नेहमी केसांच्या मध्यभागापासून खालच्या टोकापर्यंत लावावे; ते मुळांना लावणे टाळावे.
केस धुल्यानंतर ते थोडे ओलसर (Damp) असताना सीरम लावल्यास ते केसांमध्ये नीट शोषले जाते.
सीरम लावल्यामुळे केस मऊ होतात, ज्यामुळे विंचरताना केस कमी तुटतात आणि गुंता सहज निघतो.
सीरम कधीही टाळूवर लावू नका, कारण यामुळे डोक्याची त्वचा चिकट होऊन कोंडा किंवा खाज येऊ शकते.
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार (ड्राय, कुरळे किंवा सरळ) योग्य सीरमची निवड करणे फायदेशीर ठरते.