Wash Basin Blocked | वॉश बेसिन ब्लॉक? ५ मिनिटांत घरच्या घरी करा साफ

पुढारी वृत्तसेवा

वॉश बेसिन चोकअप (drain blockage) ही प्रत्येक घरातील वारंवार होणारी समस्या आहे. यामुळे महिला वर्ग त्रस्त होतो

वॉश बेसिन चोकअप समस्येवर वेळेवर उपाय न केल्यास ती गंभीर होऊ शकते. नियमित साफसफाई आणि योग्य सवयी ठेवल्यास ही समस्या सहज टाळता येते

साबणाचा थर, केस, अन्नाचे कण, ग्रीस जमा झाल्यामुळे पाणी हळूहळू वाहू लागते किंवा पूर्णपणे अडते. यावरील प्रतिबंधात्मक उपाय खाली दिलेले आहेत

केस व साबणाचे थर जमा होणे, अन्नाचे कण, तेल व ग्रीस पाइपमध्ये साचणे ही चोकअप होण्याची प्रमुख कारणे आहेत, जुन्या पाइपलाइनमध्ये गंज किंवा अरुंदपणामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे येतात

चोकअप काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा, उकळते पाणी हळूहळू ड्रेनमध्ये टाकल्यास ग्रीस किंवा साबणामुळे झालेला ब्लॉकेज सैल होण्यास मदत होते

बेकिंग सोडा + व्हिनेगर ½ कप बेकिंग सोडा ड्रेनमध्ये टाकून त्यावर 1 कप व्हिनेगर टाका, 10–15 मिनिटे थांबा, नंतर गरम पाणी ओता

बेसिनमध्ये थोडे पाणी ठेवा, प्लंजरने 10–15 वेळा दाब दिल्यास सक्शनमुळे ब्लॉकेज बाहेर येण्यास मदत होते

ड्रेन क्लीनिंग वायर पाईपमध्ये टाकून फिरवा, त्यामुळे अडकलेले केस किंवा घाण बाहेर पडते

बेसिनखालील U-आकाराचा पाइप (P-trap) काढून त्यात अडकलेली घाण साफ करून घ्या

येथे क्लिक करा