पुढारी वृत्तसेवा
काकडीत सुमारे 96 टक्के पाणी असते, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेऊन ताजेपणा देण्यास मदत करते
काकडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते
व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस् त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. काकडी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते
प्रवासात, वेळ कमी असेल तेव्हा काकडी तशीच (पूर्ण) खाणे चांगले. लहान, ताजी काकडी (baby cucumber) असेल तर तशीच खाणे उत्तम
सालासकट काकडी खाल्ल्यास सर्व पोषक घटक मिळतात: फायबर, व्हिटॅमिन K आणि अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात मिळतात
घरी, सॅलड किंवा जेवणात चव वाढवण्यासाठी काकडी कापून खाऊ शकता, यामुळे लहान तुकडे असल्याने पचायला सोपी जाते
मीठ, लिंबू, चाट मसाला घालून खाऊ शकता, सॅलड, रायता, सँडविचमध्ये वापर करता येतो, मात्र, काकडी जास्त वेळ कापून ठेवल्यामुळे व्हिटॅमिन C कमी होतात
आरोग्यदृष्ट्या पोषणासाठी काकडी सालासकट तशीच खाणे उत्तम आहे, तर पचनासाठी कापून खाणे अधिक चांगले असले, तरी काकडी दोन्ही पद्धतीने खाल्यास फायदेशीर ठरते
काकडी सकाळी किंवा दुपारी खाणे अधिक फायदेशीर ठरते, रात्री जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो