पुढारी वृत्तसेवा
आमटी-भाजीच्या मसाल्यांमध्ये धने हा महत्त्वाचा पदार्थ आहे. धन्याच्या हिरव्या रोपाला कोथिंबीर असे म्हणतात.
आमटी-भाजीची चव वाढवणारे धने आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. हे शरीरातील उष्णता कमी करून पित्त शांत ठेवण्यास मदत करतात.
महर्षी चरक यांच्या मते, धने हे तहान शांत करणारे असून सर्दी आणि कफाच्या त्रासावर अत्यंत गुणकारी आहेत.
आयुर्वेदाचार्य सुश्रुत यांच्या मते, धने हे ताप घालवणारे (ज्वरनाशक), पचनशक्ती वाढवणारे , शरीराची आग शांत करणारे आणि उलटीवर मात करणारे औषध आहे.
युनानी वैद्यकशास्त्रानुसार धने हे छातीतील कफ नाहीसा करतात, शांत झोप आणतात, लघवीचे प्रमाण वाढवतात आणि पोटदुखीवर मात करून पाचक ठरतात.
वैज्ञानिकांनुसार धने हे नैसर्गिक उत्तेजक, उदरवातहर आहे. अॅलोपॅथीमध्ये अपचन आणि पोटशूळावरील उपचारांसाठी धन्याच्या तेलाचा वापर केला जातो.
धने आणि जिरे समप्रमाणात कुटून तयार केलेला मसाला उत्तम पित्तशामक आहे. विशेषतः पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी याचा आहारात रोज वापर करावा.
रात्री पाण्यात भिजवलेले धने सकाळी कुस्करून त्यात खडीसाखर घालून प्यायल्याने पोटातील जळजळ आणि पित्तज्वरामुळे होणारा दाह त्वरित शांत होतो.
अर्धा तोळा धने उकळून त्यात साखर घालून रोज सकाळी प्यायल्याने मंद झालेली पचनक्रिया वेगाने सुधारते आणि अरुची दूर होते.
धने भिजवलेले पाणी गाळून त्याने डोळे धुतल्यास डोळे दुखणे थांबते आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होतो.
धने आणि खडीसाखर तांदुळाच्या पेजेमध्ये मिसळून प्यायला दिल्याने लहान मुलांचा खोकला व श्वासाचा त्रास बरा होतो.