पुढारी वृत्तसेवा
एफबीआयचं (FBI) प्रशिक्षण घेतलेले प्रसिद्ध बॉडी लँग्वेज तज्ज्ञ जुआन मॅन्युएल गार्शिया लोपेझ यांनी खोटेपणा पकडण्याची एक एकदम भारी ट्रिक सांगितली आहे.
लोपेझ यांच्या मते, आपण ज्याचा कधी विचारही केला नसेल, शरीराच्या अशा एका अंगावरून समोरची व्यक्ती सत्य बोलतेय की थापा मारतेय, हे सहज समजू शकतं.
आपण सहसा बोलताना लोकांचे चेहरे किंवा हात पाहतो, पण माणसाचे 'पाय' खोटेपणा उघड करण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावतात!
जेव्हा एखादी व्यक्ती अचानक पूर्णपणे गप्पगार किंवा एकदम ताठ उभी राहते, तेव्हा सावध व्हा; कारण ही भीतीची किंवा काहीतरी लपवण्याची मुख्य खूण असते.
एखादी व्यक्ती खोटं बोलत असताना किंवा भीतीच्या छायेत असताना चेहरा लाल होणे, बाहुल्या विस्तारणे किंवा नाकपुड्या फुगणे या गोष्टींवर अजिबात नियंत्रण राहत नाही.
कोणी वरवर 'मी खूप आनंदी आहे' असं म्हणत असेल, पण त्यांचं शरीर मात्र आखडलेला पवित्रा घेत असेल, समजून जा की शब्दांत आणि बॉडी लँग्वेजमध्ये विरोधाभास आहे.
संवाद साधताना व्यक्तीच्या पायाची पावलं किंवा बोटे दरवाज्याकडे निर्देश करत असतील, समजून घ्या की भीती, घाईमुळे त्यांना तिथून तातडीने बाहेर पडायचं आहे!
काही लोक इतके धूर्त असतात की, ते समोरच्याला गंडवण्यासाठी खोट्या शारीरिक हालचाली किंवा कृत्रिम हावभाव करून तुमच्या मेंदूला सहज चकवा देऊ शकतात.
त्यामुळे पुढच्या वेळी समोरची व्यक्ती थापा मारतेय असा संशय आल्यास, फक्त चेहऱ्याकडेच नाही तर त्यांच्या पायांच्या हालचालींवरही आवर्जून लक्ष ठेवा!