पुढारी वृत्तसेवा
आजकाल फिटनेस आणि मसल्स बनवण्याच्या नादात आहारात प्रोटीनचे प्रमाण खूप वाढवत आहेत, पण अतिरेक महागात पडू शकतो!
स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या योग्य कार्यासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे, मात्र प्रत्येकाची प्रोटीनची गरज त्यांच्या शारीरिक वजनावर अवलंबून असते.
ICMR आणि राष्ट्रीय आहार तज्ज्ञांच्या (RDA) अहवालानुसार, सामान्य व्यक्तीने दर १ किलो वजनामागे ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन घेणे आवश्यक असते.
जास्त प्रोटीन खाल्ल्याने किडनीचे कार्य वाढते (ग्लोमेरुलर हाइपरफिल्ट्रेशन), ज्यामुळे किडनीला जास्त मेहनत करावी लागते.
किडनीचा त्रास असणार्यांसाठी जास्त प्रमाणात प्रोटीन घेणे अत्यंत हानिकारक ठरू शकते.
प्रोटीनच्या पचनामुळे शरीरात यूरिया तयार होतो. जास्त प्रोटीन घेतल्यास यूरियाचे प्रमाण वाढू शकते, ज्याची विल्हेवाट किडनीला लावावी लागते.
हाय-प्रोटीन डाएट घेताना शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
केवळ प्रोटीनवर लक्ष केंद्रित न करता आहारात फळे, भाज्या आणि फायबरचाही समावेश करा, जेणेकरून शरीराचा समतोल बिघडणार नाही.