Refrigerator Bad Smell: फ्रीजमधील दुर्गंधी चुटकीसरशी दूर करते ही १० रूपयाची पावडर

Anirudha Sankpal

उन्हाळ्यात फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न किंवा फळे-भाज्या सडल्यामुळे पूर्ण फ्रिजमध्ये दुर्गंधी पसरते, जी इतर अन्नातही जाते.

फ्रिजमधील ही दुर्गंधी घालवण्यासाठी शिळे आणि खराब झालेले अन्न बाहेर फेकून देणे सर्वात आधी गरजेचे आहे.

फ्रिजची दुर्गंधी दूर करण्याचा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे फक्त १० रुपयांचा कॉफी पावडरचा छोटा पुडा (Sachet) वापरणे.

एका वाटीत दोन चमचे कॉफी पावडर काढून ती वाटी न झाकता फ्रिजमध्ये ३ ते ४ तासांसाठी तशीच ठेवून द्यावी.

कॉफी पावडर फ्रिजमधील सर्व दुर्गंधी शोषून घेते आणि फ्रिजमध्ये एक छान, ताजा सुवास पसरवते.

दुसरा उपाय म्हणजे दीड कप पाण्यात २ चमचे व्हॅनिला एसेन्स (Vanilla Essence) मिसळून फ्रिजमध्ये त्याचा स्प्रे करावा.

व्हॅनिला स्प्रे केल्यानंतर फ्रिज एका कोरड्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा, जेणेकरून तिथे ओलावा राहणार नाही.

फ्रिजमध्ये दूध किंवा भाजी सांडल्यास ती लगेच पुसावी आणि खराब अन्न वेळोवेळी बाहेर काढून फ्रिज स्वच्छ ठेवावा.

येथे क्लिक करा