Hybrid Tomato: कॅन्सरशी लढण्यासाठी कोणता टॉमेटो उत्तम?

Anirudha Sankpal

भारतीय स्वयंपाकात टोमॅटो अत्यंत महत्त्वाचा असून बाजारात मुख्यत्वे 'देशी' आणि 'हायब्रिड' असे दोन प्रकार पाहायला मिळतात.

हायब्रिड टोमॅटो हे दोन वेगवेगळ्या प्रजातींचे क्रॉस-पॉलिनेशन करून, जास्त काळ टिकावेत आणि कीड लागू नये म्हणून तयार केले जातात.

हायब्रिड टोमॅटो आकाराने थोडे लांबट, जाड सालीचे, कमी रसाचे आणि कमी आंबट असतात; जे सॅलडसाठी उत्तम मानले जातात.

याउलट, देशी टोमॅटो गोल आकाराचे, पातळ सालीचे, जास्त बिया व भरपूर रस असलेले आणि चवीला अधिक आंबट व सुवासिक असतात.

चटणी, कढी, रस्सम आणि भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी जास्त रसदार आणि आंबट असलेले देशी टोमॅटो सर्वोत्तम ठरतात.

हायब्रिड टोमॅटोमध्ये कॅन्सरशी लढणारे 'लायकोपीन' हे अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते आरोग्यासाठी सुरक्षित आहेत.

मात्र, हायब्रिड टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर जास्त केला जातो, हा एकच त्याचा तोटा आहे.

आरोग्याच्या दृष्टीने देशी टोमॅटो जास्त फायदेशीर मानले जातात, कारण ते बऱ्याचदा नैसर्गिक (ऑर्गेनिक) पद्धतीने पिकवले जातात आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स व व्हिटॅमिन ए, सी चे प्रमाण भरपूर असते.

येथे क्लिक करा