पुढारी वृत्तसेवा
चेहऱ्यावरील मुरुम (Acne) निघून गेल्यावर त्वचा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागतो.
हे काळे डाग (Post-Inflammatory Hyperpigmentation) घालवण्यासाठी घरगुती उपाय
ताजी कोरफडीची जेल डागांवर लावून १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा
यामुळे त्वचेची जळजळ कमी होते आणि डाग फिके पडतात.
बटाट्याचा रस काढून डागांवर १०-१५ मिनिटे लावा, नंतर धुवून टाका.
१ चमचा बेसनात चिमूटभर हळद आणि १ चमचा दही मिसळून पेस्ट बनवा
ही पेस्ट आठवड्यातून २-३ वेळा चेहऱ्यावर २० मिनिटे लावा.
१ चमचा मधात ३-४ थेंब लिंबाचा रस मिसळून डागांवर लावा
उन्हात जाण्यापूर्वी रोज SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन नक्की लावा.
मुरुम किंवा त्याच्या खपल्या हाताने फोडू किंवा ओरबाडू नका.
दिवसातून दोनदा त्वचेच्या प्रकारानुसार (Oily/Dry) सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा.
त्वचा तेलकट असली तरीही 'Non-comedogenic' (छिद्रे बंद न करणारे) मॉइश्चरायझर नक्की वापरा.