पुढारी वृत्तसेवा
अळीवाची खीर अत्यंत पौष्टिक, चविष्ट, झटपट होणारा पदार्थ आहे
हे हिमोग्लोबिनसाठी, कंबरदुखी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे
साहित्य: अळीव २ ते ३ चमचे, दूध २ कप (फुल क्रीम), साखर ४ चमचे, तूप १ चमचा
ओले खोबरे (किसलेले) २ ते ३ चमचे, वेलची/जायफळ पूड अर्धा चमचा, काजू, बदाम काप
कृती: अळीव २ ते ३ तास थोडे पाणी किंवा दुधात भिजत ठेवा.
भिजल्यानंतर ते फुगून चिकट (जेलीसारखे) होतात.
कढईत तूप गरम करून काजू, बदाम, किसलेले ओले खोबरे २ मिनिटे परतून घ्या.
त्याच कढईत २ कप दूध घालून मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.
दुधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेले अळीव घाला.
मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे सतत ढवळत शिजवून घ्या.
अळीव शिजल्यावर त्यात साखर, वेलची-जायफळ पूड घाला.
साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत १-२ मिनिटे शिजवून गॅस बंद करा.