पुढारी वृत्तसेवा
'आयसोथिओसायनेट' या घटकामुळे मुळ्याला वास आणि तिखटपणा असतो
मुळा किसून/त्याचे तुकडे करून त्यावर १ ते २ चमचे मीठ चोळून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा
काही वेळाने मुळ्याला पाणी सुटेल. ते पाणी हाताने घट्ट पिळून फेकून द्या
मुळ्याच्या Slices किंवा लांब काप करून ते बर्फाच्या पाण्यात ५ ते १० मिनिटे बुडवून ठेवा
त्यामुळे तो छान कुरकुरीत होतो. सलॅडसाठी मुळा वापरताना ही ट्रिक उत्तम ठरते
मुळ्यावर ताजा लिंबू पिळा, थोडे ॲपल सायडर / व्हाईट व्हिनेगरही चालेल
लिंबातील आंबटपणा (ॲसिड) मुळ्यातील उग्र घटकांना न्यूट्रलाइज करतो
जर तुम्ही मुळ्याची कोशिंबीर करत असाल, तर त्यात ताजे दही किंवा थोडे घट्ट ताक मिसळा
किसलेला मुळा २ मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्या किंवा वाफवून घ्या.