vegetables for cholesterol : खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? या भाज्यांचा आहारात समावेश करा
पुढारी वृत्तसेवा
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
आहारात काही भाज्यांचा समावेश केल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी हाेण्यास मदत हाेते.
पालकमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे घटक LDL कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
गाजरामध्ये पेक्टिन नावाचे विद्राव्य फायबर असते. ते खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
भेंडीमधील म्युसिलेज नावाचा घटक खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो.
फ्लॉवरमध्ये फायबर आणि अनेक संयुगे असतात. ती चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात.
वांग्यामध्ये असणारे नैसूनिन नावाचे अँटिऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल कमी करून धमन्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
कोबीमध्ये विद्राव्य फायबर आणि पॉलिफेनॉल्स असतात. ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
येथे क्लिक करा.