Protect Tooth Enamel | दातांचे इनॅमल सुरक्षित ठेवून नैसर्गिक चमक कशी टिकवावी?

पुढारी वृत्तसेवा

नेहमी मऊ केस असलेला ब्रश वापरा. दात घासताना जास्त जोर लावू नका.

कडक ब्रशने दात घासल्याने इनॅमलचा थर हळूहळू घासून निघून जातो.

ब्रश ४५ अंशाच्या कोनात धरून वर्तुळाकार किंवा वर-खाली अशा हलक्या हाताने घासा.

सकाळी आणि रात्री फक्त २ मिनिटे ब्रश करणे पुरेसे असते.

लिंबू, संत्री, कोल्डड्रिंक्स, व्हिनेगर यांसारखे आम्लयुक्त पदार्थ इनॅमल कमकुवत करतात.

असे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर लगेच ब्रश करू नका

लगेच ब्रश केल्यास मऊ झालेले इनॅमल सहज निघून जाते.

कमीत कमी ३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चुळ भरावी.

बेकिंग सोडा, लिंबाचा रस, मीठ दात पांढरे करत असले तरी ते योग्य प्रमाणात वापरा

हे उपाय महिन्यातून/ १५ दिवसांतून एकदाच करावेत

Get rid of Glasses | चष्मा कायमचा काढायचा आहे? रोज करा हे ५ सोपे डोळ्यांचे व्यायाम