पुढारी वृत्तसेवा
घट्ट आणि मलाईदार दही बनवण्यासाठी साययुक्त किंवा फुल-फॅट दूध वापरणे उत्तम ठरते. दुधातील फॅट जितके जास्त, तितके दही अधिक रिच बनते.
दूध 8 ते 10 मिनिटे मंद आचेवर उकळल्याने त्यातील पाण्याचे प्रमाण थोडे कमी होते आणि दही अधिक घट्ट लागते.
दूध खूप गरम किंवा खूप थंड नसावे. कोमट तापमानात विरजण घातल्यास दही उत्तम जमतं.
ताजे आणि घट्ट दही विरजण म्हणून वापरल्यास दह्याची गुणवत्ता सुधारते.
विरजण घातल्यानंतर भांडे वारंवार हलवल्यास दही व्यवस्थित जमत नाही. ते एका जागी स्थिर ठेवावे.
दही लवकर आणि चांगले जमण्यासाठी भांडे उबदार ठिकाणी ठेवणे फायदेशीर ठरते.
मातीचे भांडे अतिरिक्त ओलावा शोषून घेते, त्यामुळे दही अधिक घट्ट आणि मलाईदार बनते.
दही पूर्णपणे जमल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा. खूप लवकर फ्रिजमध्ये ठेवल्यास दही पातळ राहू शकते.
दही जास्त आंबू देऊ नका. योग्य वेळी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातून पाणी कमी सुटते