पुढारी वृत्तसेवा
बैठे काम करणार्यांचे ऑफिसमध्ये सलग बसणे होते.
सलग बसल्यामुळे वजन वाढणे, हृदयविकार आणि टाईप २ मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढू शकतो.
बैठ्या कामातून काही वेळ दूर राहणे चांगले असल्याचे माहित असूनही लोक याकडे दुर्लक्ष करतात.
'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन'मध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार, तासाला पाच मिनिटांचा ब्रेक घेणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी उत्तम आणि सोपा उपाय आहे.
कोलंबिया युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात अमेरिकेतील ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
संशोधनात सहभागी झालेले बहुतांश कर्मचारी ऑफिसमध्ये काम करणारे आणि ८ ते ९ तासांची शिफ्ट करणारे होते.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येचे पालन केले आणि थकवा, मूड व कामाच्या कामगिरीबद्दलच्या दैनंदिन सर्वेक्षणाचे फॉर्म भरले.
कर्मचार्यांना कामाच्या दरम्यान दर अर्ध्या तासाने, दर तासाने किंवा दर दोन तासांनी पाच मिनिटांचा वॉकिंग ब्रेक घेण्यास सांगण्यात आले.
दर अर्ध्या तासाने चालणे मूड सुधारण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरले, पण यामुळे दैनंदिन कामात अडथळा येत होता.
संशोधकांना असे आढळले की, दर तासाला पाच मिनिटे चालल्याने उत्पादकता, मूड आणि सतर्कतेमध्ये सर्वात जास्त सुधारणा झाली.