How to make Sweet Champakali | दिसायला सुरेख, चवीला अप्रतिम! पारंपरिक चंपाकळ्या कशा बनवायच्या?

पुढारी वृत्तसेवा

श्रावणात हळदीकुंकू, मंगळागौर, नैवेद्यासाठी एकदम मस्त चंपाकळ्या बनवल्या जातात

घरच्या घरी कुरकुरीत आणि खुसखुशीत चंपाकळ्या कशा बनवायच्या पाहुया.

साहित्य: मैदा- २ वाट्या, गरम तुपाचे मोहन: २ ते ३ चमचे, साखर: १ वाटी (पाकासाठी)

वेलची पूड: १/२ चमचा, केशर: ५-६ काड्या, मीठ: चिमूटभर, तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती: १. एका पसरट भांड्यात मैदा चाळून घ्या.

त्यात चिमूटभर मीठ, २-३ चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन टाका.

हाताने तूप आणि मैदा छान एकजीव करा.

एका पसरट भांड्यात मैदा चाळून घ्या.

त्यात चिमूटभर मीठ, २-३ चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन टाका.

हाताने तूप आणि मैदा छान एकजीव करा.

त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या.

पिठावर ओला कपडा झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.

२. एका भांड्यात १ वाटी साखर, त्यात १/२ वाटी पाणी टाकून गॅसवर ठेवा.

साखर वितळल्यानंतर उकळी येऊ द्या. १ तारी पाक तयार करा.

पाकात वेलची पूड आणि केशर घालून गॅस बंद करा.

मळलेल्या पिठाचे लहान-लहान गोळे तयार करा.

एक गोळा घेऊन त्याची पातळ गोल पुरी लाटून घ्या.

लाटलेल्या पुरीच्या मधोमध सुरीने उभ्या समांतर रेषा कापा.

पुरीचे दोन्ही समोरासमोरील टोक पकडून हळूवार गुंडाळत Roll करा

दोन्ही बाजूंची टोके एकत्र दाबून घट्ट बंद करा

४. कढईत तेल/तूप मंद आचेवर गरम करा.

मंद आचेवर चंपाकळ्या छान हलक्या गुलाबी, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

तळलेल्या गरम चंपाकळ्या लगेचच कोमट साखरेच्या पाकात टाका.

२ ते ३ मिनिटे पाकात मुरू दिल्यानंतर बाहेर काढा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Benefits of Avoiding Alcohol in Shravan-श्रावणात महिनाभर मद्य वर्ज्य केल्याने शरीरात काय बदल होतात?