स्वालिया न. शिकलगार
मैदा २ कप, तांदूळ पीठ ३ चमचे, तूप ४ चमचे, ओवा, जीरे, पांढरे तीळ १-१ चमचा
तिखट, १ चमचा, हळद-हिंग चिमूटभर, मीठ, तेल
बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात ओवा, तीळ, तिखट, हळद, हिंग, मीठ, गरम तुपाचे मोहन घाला.
सर्व साहित्य चांगले एकत्र करा आणि थोडे-थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळा
कणिक १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा. वाटीत २ चमचे साजूक तूप घ्या.
त्यात ३ चमचे तांदळाचे पीठ/मैदा घालून फेटा, यामुळेच चिरोट्यांना छान पदर सुटतात.
मळलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे बनवून पातळ पोळ्या लाटून घ्या.
एका पोळीवर साटा लावा, त्यावर दुसरी पोळी ठेवा. अशी ३-४ पोळ्यांची घडी करा.
याचा घट्ट रोल वळून घ्या आणि सुरीने लहान तुकडे कापून छोटी पुरीसारखे लाटून घ्या
कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून चिरोटे मंद आचेवर तळा
हे थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात ठेवा, महिनाभर टिकतात