Shravan Sweet Potato Spicy Recipe| चविष्ट रताळ्याचा तिखट किस कसा बनवायचा?

पुढारी वृत्तसेवा

साहित्य: २ मोठी रताळी, २-३ हिरव्या मिरच्या ठेचून, १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

१ चमचा जीरे, १-२ चमचे तूप/तेल, सैंधव मीठ चवीनुसार

कृती : रताळी स्वच्छ धुऊन, साल काढून घ्या

किसणीच्या मोठ्या छिद्रांनी रताळी किसून घ्या

किस काळा पडू नये म्हणून किसल्यानंतर लगेच फोडणी द्यावी किंवा पाण्यात ठेवावा

कढईत तूप/तेल गरम करून त्यात जीरे, मिरची घालून १ मिनिटे परतून घ्या.

यात रताळ्याचा किस, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा.

कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ४-५ मिनिटे वाफ काढून घ्या

रताळे मऊ होईपर्यंतमध्ये हळूहळू परता

किस शिजल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा

पुन्हा १ मिनिट वाफ काढून गॅस बंद करा

घरच्या घरी झटपट सुकी भेळ कशी बनवायची?