Shravan Fruit-based Recipe|श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी झटपट फलाहार रेसिपी केळी-खजूर शेक

पुढारी वृत्तसेवा

साहित्य: २ पिकलेली केळी, ४-५ बिया काढलेले मऊ खजूर, १ ग्लास दूध

४-५ बदाम/काजूचे तुकडे, १/४ चमचा वेलची पूड

कृती: मिक्सरच्या भांड्यात चिरलेली केळी, खजूर, थोडे दूध घालून बारीक वाटून घ्या

त्यात उर्वरित दूध आणि वेलची पूड घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा

वरून बदाम-काजूच्या कापांनी सजवून सर्व्ह करा.

खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोजचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते

खजूरमध्ये आयर्न भरपूर असते. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते

केळीमधील 'पेक्टिन' हे फायबर पचन संस्था सुधारते

पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 मुळे हृदयाचे ठोके नियमित राहतात

Benefits Of Amsul |आमसूल जेवणात का वापरावे? चवीसोबत मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे