स्वालिया न. शिकलगार
साहित्य - २ चमचे जवसाच्या बिया, २ कप पाणी
कृती- पाणी आणि जवसाच्या बिया एका भांड्यात घ्या
मध्यम आचेवर १० मिनिटे उकळा
मिश्रण जेलसारखे घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करा
थोडे कोमट असतानाच गाळून जेल वेगळे करा
जेल पूर्ण थंड होऊ द्या, तुम्ही यामध्ये १ चमचा कोरफडीचा जेल घालू शकता
केसांच्या अधिक पोषणासाठी १ चमचा खोबरेल तेल किंवा बदाम तेल घालू शकता
हे सर्व एकत्र मिसळून, केसांना लावा