How to make homemade Gulmohar chivda:घरच्या घरी बनवा कुरकुरीत गुलमोहर चिवडा

पुढारी वृत्तसेवा

साहित्य-जाड पोहे २ कप, पातळ पोहे २ कप, शेंगदाणे १/२ कप, भाजकी डाळ १/२ कप

काजू-मनुके, सुके खोबरे लांब काप १/२ कप, हिरव्या मिरच्या

तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, पिठीसाखर, मीठ, कढीपत्ता

पातळ पोहे मंद आचेवर हलकेच कुरकुरीत भाजून घ्या.

जाड पोहे गरम तेलात जाळीच्या गाळणीत ठेवून छान तळून घ्या.

दोन्ही पोहे एका मोठ्या भांड्यात एकत्र करा.

तेलात शेंगदाणे, डाळ, खोबरे, काजू-मनुके तळून घेऊन सर्व पोह्यांवर टाका

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, मिरची, कढीपत्ता टाका

कढीपत्ता, मिरची पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळून शेवटी हळद घालून गॅस बंद करा.

तयार फोडणी पोह्यांच्या मिश्रणावर ओता. वरून मीठ, पिठीसाखर टाका

व्यवस्थित एकत्र करून चिवडा पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा

झटपट बदामी शिरा कसा बनवायचा?