पुढारी वृत्तसेवा
शाही आणि पौष्टिक बदाम शीरा घरच्या घरी बनवण्याची सोपी कृती पाहा
साहित्य: बदाम १ कप, साजूक तूप १/२ कप, साखर ३/४ कप, दूध १/२ कप,
गरम पाणी १/४ कप, केसर ७-८ काड्या, वेलची पूड १ चमचा
कृती :बदाम ४ ते ५ तास गरम पाण्यात भिजत ठेवा.
साल काढून बदाम मिक्सरमध्ये थोडे दूध रव्यासारखे वाटून घ्या
कढईत साजूक तूप गरम करा आणि त्यात बदामाची पेस्ट घाला.
सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर ही पेस्ट ढवळत राहा
तुपाचा छान खमंग वास येईपर्यंत परता
आता त्यात दूध, थोडे गरम पाणी, केसर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा
मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि कढईच्या कडा सोडूपर्यंत मंद आचेवर शिजू द्या
शेवटी साखर, वेलची पूड घालून विरघळेपर्यंत परता