How to made Herbal Shampoo|घरच्या घरी केसांसाठी उत्तम हर्बल शॅम्पू कसा तयार करायचा?

पुढारी वृत्तसेवा

साहित्य- १०० ग्रॅम रिठा, १०० ग्रॅम शिकेकाई, ५० ग्रॅम सुका आवळा, १ लिटर पाणी

रिठा, शिकेकाई आणि आवळा १ लिटर पाण्यात एकत्र करा.

हे मिश्रण रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात उतरेल.

सकाळी हे मिश्रण मंद आचेवर १५-२० मिनिटे उकळून घ्या.

पाणी निम्मे होईपर्यंत उकळा आणि नंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

थंड झाल्यावर हाताने सर्व घटक नीट कुस्करून घ्या.

कापडाने, चाळणीने पाणी गाळून घ्या व काचेच्या बाटलीत साठवा.

ओल्या केसांवर हा शाम्पू लावून २ मिनिटे मसाज करा आणि धुवा.

यामुळे कोंडा दूर होतो, केस मऊ आणि चमकदार होतात.

Naivedya Sheera :घरच्या घरी बनवा मऊ, खमंग-तुपाळ शिरा; नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी