Healthy Tea : 'या' सोप्या घरगुती टीप्सने चहाला बनवा हेल्दी

पुढारी वृत्तसेवा

अति साखर, भरपूर चरबीयुक्‍त दूध असणारा चहा आरोग्‍यासाठी उपायकारक ठरु शकतो.

चहातील आरोग्‍यास अपायकारक घटक पित्त वाढवतात, तसेच शरीरात लोह शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

घरात दररोज करण्‍यात येणार्‍या चहामध्‍ये काही बदल आरोग्‍यासाठी अनुकूल ठरु शकतो.

चहामधील साखरचे प्रमाण हळूहळू कमी करा. त्याऐवजी सैंद्रिय गुळाचा वापर करा.

कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट कमी करण्यासाठी टोन्ड दूध , बदाम दूध किंवा ओट दूधच्‍या पर्यायांचा वापर करा.

चहाची पाने जास्त वेळ उकळल्यास त्यात टॅनिन वाढते. चहा कडू होतो आणि पोटासाठी तो हानिकारक ठरू शकतो.

चहात तुळस किंवा लवंग घातल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते आणि घशाला आराम मिळतो.

संतुलित चव आणि सहज पचनासाठी चहा फक्त २ ते ३ मिनिटे उकळा.

चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि कॅफिनचे प्रमाण वाढते.

चहामुळे होणारे नुकसान टाळण्‍यासाठी नेहमी ताजा चहाचेच सेवन करा.

चहाबरोबर तळलेल्या चटपटीत पदार्थांऐवजी सुका मेवा किंवा धान्याचे बिस्किटे यासारखे आरोग्यदायी पर्याय निवडा.

खुलासा : ही माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी.कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.