Benefits Of Garlic : उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या आरोग्यासाठीचे लाभ!

पुढारी वृत्तसेवा

रोज सकाळी उपाशी पोटी एक लसूणाची कुडी खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

लसूण शरीराचा मेटाबॉलिज्म (चयापचय) वाढवतो.

लसूण शरीरातील 'बॅड कोलेस्टेरॉल' कमी करतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनाचे एंझाईम्स सक्रिय होतात. यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचते आणि पचनशक्ती सुधारते.

लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो आणि यकृत स्वच्छ ठेवतो. यामुळे शरीराचे नैसर्गिकरित्या 'शुद्धीकरण' (डिटॉक्स) होते.

उपाशी पोटी लसूण खाल्‍याने शरीराचा मेटाबॉलिज्म दर वाढतो आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

weight loss tips without gym | Canva

मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसूण अत्यंत उपयुक्त मानला जातो. तो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

एका अभ्यासानुसार, लसूण फुफ्फुस आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करतो.

(टीप: वरील माहिती केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. आहारात बदल करण्‍यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

येथे क्‍लिक करा.