Anirudha Sankpal
त्वचेवरील धुळीचे कण, तेल आणि घाण काढून टाकण्यासाठी आणि नैसर्गिक चमक (Natural Glow) मिळवण्यासाठी कोरियन पद्धतीचा हा फेसवॉश उपयुक्त ठरतो.
दोन चमचे जाडसर (unpolished) तांदूळ, थोडे मध (किंवा ॲलोवेरा जेल) आणि गुलाबपाणी.
दोन चमचे तांदूळ एका ग्लास पाण्यात सुमारे २० ते २५ मिनिटे मऊ होईपर्यंत भिजत ठेवावेत.
भिजवलेले तांदूळ पाण्यासह मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत आणि ते गाळणीने स्वच्छ भांड्यात गाळून घ्यावेत.
या गाळलेल्या तांदळाच्या पाण्यात थोडे मध (पिंपल्स असल्यास ॲलोवेरा जेल) आणि गुलाबपाणी नीट मिसळावे.
चेहरा साध्या पाण्याने धुतल्यानंतर या मिश्रणाने १-२ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करून पुन्हा चेहरा धुवून घ्यावा.
फेसवॉश वापरल्यानंतर चेहऱ्यावर चांगले मॉइश्चरायझर लावावे.
हे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने ते १-२ दिवसांपेक्षा जास्त वापरू नये आणि नेहमी फ्रीजमध्येच साठवून ठेवावे.