पुढारी वृत्तसेवा
साहित्य: सुक्या नारळाच्या शेंड्या, १ सुती धागा / काथ्याची दोरी किंवा ताग
नारळाच्या शेंड्यांमधील भुकटी (कोकोपीट) हाताने झटकून पूर्णपणे काढून घ्या.
फक्त लांब आणि मजबूत काथ्याचे धागे शिल्लक ठेवा.
शेंड्या हाताच्या तळहातावर किंवा ४ बोटांभोवती घट्ट गोल गुंडाळून घ्या.
भांडी घासण्यासाठी सोयीचा पडेल इतका गोल आकार द्या.
या काथ्याच्या गुंडाळीला मध्यभागी आणि बाजूने सुती धाग्याने घट्ट गाठ मारा
यामुळे भांडी घासताना काथ्या सुटणार नाही.
कडांना आलेले जास्त लांब धागे कात्रीने कापून नीट करा
तुमचा इको-फ्रेंडली स्क्रबर वापरण्यासाठी तयार आहे.