पुढारी वृत्तसेवा
साहित्य- मंच्युरिअन बॉल्ससाठी बारीक किसलेला कोबी २ वाट्या, मैदा ४ चमचे, कॉर्नफ्लॉवर ३ चमचे
आलं-लसूण पेस्ट १ चमचा, हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
काळी मिरी पूड - अर्धा चमचा, सोया सॉस १ चमचा, मीठ, तेल
सॉस/ग्रेव्हीसाठी: बारीक चिरलेला लसूण १ मोठा चमचा, बारीक चिरलेले आलं १ लहान चमचा
उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या २, कांद्याची पात/चिरलेला कांदा अर्धी वाटी
शिमला मिरची चिरलेली अर्धी वाटी, डार्क सोया सॉस १ मोठा चमचा, रेड चिली सॉस १ मोठा चमचा
टोमॅटो केचप १ मोठा चमचा, व्हेनेगर १ चमचा, कॉर्नफ्लॉवर १ चमचा + ३ चमचे पाणी एकत्र ढवळून, तेल २ चमचे
कृती- १) भांड्यात किसलेला कोबी, आलं-लसूण पेस्ट, तिखट, सोया सॉस, काळी मिरी पूड, मीठ एकत्र करा.
त्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून चांगले मळून घ्या
कोबीला स्वतःचे पाणी सुटत असल्याने पाणी घालण्याची गरज नसते
२) मिश्रणाचे लहान-लहान बॉल्स तयार करा.
कढईत तेल चांगले गरम करून घ्या
हे बॉल्स मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
३) दुसऱ्या कढईत २ चमचे तेल गरम करा
त्यात चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची घालून काही सेकंद परता.
कांदा, शिमला मिरची घालून १-२ मिनिटे हलके परता
४) त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, व्हेनेगर, काळी मिरी पूड घाला
आता त्यात कॉर्नफ्लॉवरचे पाण्यातील मिश्रण घालून सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा
सॉस तयार झाल्यावर तळलेले मंच्युरिअन बॉल्स घालून छान मिक्स करा.
शेवटी वरून हिरवी कांद्याची पात टाकून गरमागरम सर्व्ह करा!