Health Tips | दररोज मोड आलेले धान्य खाण्याचे 'हे' ९ जादूई फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

मोड आलेल्या धान्यामध्ये जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे आवश्यक पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

हे पचायला हलके असतात, कारण मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे यातील जटिल (कॉम्प्लेक्स) घटकांचे साध्या स्वरूपात रूपांतर होते.

मोड आलेले धान्य खाल्ल्याने शरीरातील एन्झाईमची (पाचक रस) कार्यक्षमता वाढते. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

मोड आलेले धान्य हे प्रथिनांचा (प्रोटीन) एक उत्तम स्त्रोत आहे, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, ते वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

विटामिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे, मोड आलेले धान्य रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

मोड आलेले धान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

यातील जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

येथे क्‍लिक करा.