Soft Bhakri|टीफिनमध्ये भाकरी काही तासांत कडक होते? मऊसूद ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

पुढारी वृत्तसेवा

भाकरीचे पीठ मळताना साध्या पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करा.

पिठातील स्टार्च गुळगुळीत होतो, ज्यामुळे भाकरी छान फुलते, कडक होत नाही

पीठ जितके जास्त पाण्याचा हप्ता देऊन तळहाताने मळाल, तितकी भाकरी मऊ होते

भाकरी शेकताना गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवावी.

तव्यावर भाकरी घातल्यावर वरून लावलेले पाणी वाळू लागले की लगेच भाकरी उलटावी

भाकरी शेकल्यानंतर सुती (कॉटन) कपड्यावर १-२ मिनिटे ठेवावी, जेणेकरून जास्तीची वाफ निघून जाईल.

भाकरीची वाफ किंचित कमी झाल्यावर ती सुती कपड्यात गुंडाळून मगच टिफिनमध्ये ठेवावी.

फॉईल पेपर वापरत असाल तर आतमध्ये बटर पेपर आधी वापरावा

Soft Bhakri
Aprajita Flower|सुंदर निळी 'अपराजिता'ची फुले किती बहगुणी, कसा वापर करावा?