पुढारी वृत्तसेवा
शहाळे ही नारळाची कोवळी अवस्था आहे. यातील पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
शहाळ्याचे पाणी पिण्याची खरी मजा तेव्हाच येते, जेव्हा ते गोड असते.
अनेक लोकांना गोड पाण्याचे शहाळे कसे ओळखावे हे समजत नाही. जाणून घेवूया गोड पाण्याचे शहाळे कसे ओळखावे याच्या सोप्या टिप्स...
गडद हिरव्या रंगाचे किंवा हलक्या पिवळ्या रंगाचे शहाळे सर्वात चांगले असतात.
खूप जास्त तपकिरी (ब्राऊन) किंवा डाग असलेले नारळ खरेदी करणे टाळा; असे नारळ जुने असू शकतात.
शहाळे खरेदी करण्यापूर्वी तो कानापाशी नेऊन हलवून पहा. जर तुम्हाला पाणी हलण्याचा आवाज येत असेल, तर समजा की ते पाण्याने भरलेले आहे.
नारळाच्या वरच्या भागावर तीन खुणा असतात, ज्यांना नारळाचे 'डोळे' म्हणतात.
तुम्ही या डोळ्यांना स्पर्श करून आणि दाबून पाहिले पाहिजे. हे डोळे ओले किंवा थोडे मऊ लागत असतील, तर याचा अर्थ त्या नारळात गोड पाणी अधिक आहे.
गोल आकाराऐवजी थोडे शंकूच्या आकाराचे शहाळे निवडा. असे मानले जाते की, या आकाराच्या शहाळ्यात साय (मलाई) कमी आणि पाणी जास्त असण्याची शक्यता असते.
शहाळे खरेदी करण्यापूर्वी त्याचे वजन तपासा. नेहमी वजनाला जड असलेले शहाळे निवडावा. वजनाला हलका वाटत असेल, तर त्यातील पाणी सुकलेले असण्याची शक्यता असते.